इंदूर (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमधील एका तरुणीवर तिचा पती तिचा पती परदेशी पॉर्न व्हिडीओ पाहून जबरदस्तीने अनैसर्गिक सेक्स करीत होता. पत्नीने नकार दिल्यानंतरही ती गर्भवती असतानाही तो तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स करीत होता. यादरम्यान महिलेचा गर्भपात झाला. याबाबत तिने कोर्टात तक्रार दाखल केली आहे. २ वर्षे सुरू असलेल्या सुनावणीनंतर कोर्टाने महिलेच्या पतीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
माझं लग्न ११ मार्च २०१९ मध्ये गोव्यातील मापुसा टाऊन निवासी राहुल बिजवेसोबत झालं होतं. राहुल पोस्टल असिस्टंट पदावर कार्यरत आहे. तो मूळत: नागपूरचा राहणारा आहे. लग्नाच्या १२ दिवसांनंतर सासरच्या मंडळींनी माझ्याकडून १० लाखांची मागणी केली. पैसे दिले नाही, म्हणून ते त्रास देऊ लागले होते. लग्नाच्या वेळी दीर विशाल बिजवेने माझ्याकडून पैसे घेतले. तो रेल्वेमध्ये लोको पायलट आहे. दीर आणि सासूने मिळून माझ्याकडून दीड लाखांहून अधिक रुपये स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करायला सांगितलं. पतीदेखील तिला अनैसर्गिक सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. यादरम्यान मला दिवस गेले. शारिरीकदृष्ट्या अशक्त असल्या कारणाने डॉक्टरांनी मला बेड रेस्ट करायला सांगितलं.
यादरम्यान डॉक्टरांनी सेक्स करण्यास मना केली होती. मात्र तरीही पती त्रास देत होता. सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करीत असेल. यादरम्यान मला रक्तस्त्राव सुरू झाला. डॉक्टरांनी गर्भपातापासून वाचण्यासाठी त्यांनी इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी काही कामाची नसल्याचं म्हणत पतीने मला इंदूरला पाठवलं. दरम्यान नागपूरमध्ये गेले असता माझ्या सासऱ्याचं निधन झालं. यानंतर प्रकृती ठीक नसतानाही मी नागपूरला गेले. आणि तेथेही पतीने माझ्यासोबत अनैसर्गिक सेक्स केलं. यानंतर मला रक्तस्त्राव सुरू झाला. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर गर्भातील बाळाच्या किडनीला सूज आल्याचं लक्षात आलं. यावर पतीने उपचार केले नाही. ३० ऑगस्ट २०१९ रोजी पाचव्या महिन्यात मला एक प्रीमॅच्युअर मूल जन्माला आलं. दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आता दोन वर्षे कोर्टाच्या सुनावणीनंतर महिलेला न्याय मिळाला आहे. २ वर्षे सुरू असलेल्या सुनावणीनंतर कोर्टाने महिलेच्या पतीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.