पुणे (प्रतिनिधी) मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात माजी खासदार संजय काकडे व उषा काकडे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र ते स्वतःहून हजर न झाल्याने त्यांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी चतु:श्रृंगी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. त्यामुळे काकडे दांपत्य नेमके कुठे गायब झाले याचा तपास पोलीस करत आहेत.
गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवराज ढमाले (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात.