TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी उपनगराध्यक्ष दशरथ महाजनांचा अपघात नव्हे घातपातच

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल येथे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. दशरथ महाजन यांचा अपघात नव्हे तर घातपातच झाला असुन अपघाताचा बनाव करून तीघांनी जीवघेणा हल्ला केला असल्याची बाब पोलिस तपासातून निष्पन्न झाली असल्याची माहीती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन यांनी १४ जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचे पती दशरथ महाजन हे एरंडोल नगरपालिकेत माजी उपनगराध्यक्ष असल्याने त्यांचे शहरातील अनेक राजकीय लोकांशी मतभेद होते. त्यामुळे, त्यांच्यावर झालेला हल्ला हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वर्तवली होती.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

एलसीबीच्या दोन पथकांनी फिरवली तपासचक्रे
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग केला. त्यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार केली. या पथकांनी घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करून, तेथून ये-जा करणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

तीन्ही आरोपीकडून कबुली, वाहन जप्त

या प्रकरणी उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), शुभम कैलास महाजन (वय १९), आणि पवन कैलास महाजन (वय २०) (सर्व रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी उमेश सुतार याने पूर्व वैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी आरोपी उमेश सुतार याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.

तीन दिवसाची कोठडी
तीन ही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले असुन न्यायालयाने त्यांना दि.३० पयरंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय सोपान गोरे हे तपास करत आहे.

या पथकाची कामगिरी
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, एरंडोल पो.नि.निलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस हवालदार सोपान गोरे, हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, अक्रम, शेख, प्रविण भालेराव, रवि कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, प्रशांत पाटील यांच्या पथकाने केली आहे.

सीसीटीव्हीचे ८ तास परिक्षण, अन् धागा गवसला
विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल कोसळले होते, त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, तपास पथकातील प्रवीण मांडोळे आणि राहुल कोळी यांनी एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजचे सलग ८ तास परीक्षण केले. या अथक प्रयत्नांमधून त्यांनी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले आणि हा अपघात नसून घातपात असल्याचे उघडकीस आणले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जुलै 2026 !

July 25, 2026

ऐन दिवाळीत राज्यात मोठा अपघात, एका पाठोपाठ रेल्वेचे २० डबे रूळावरून घसरले !

October 24, 2022

खळबळजनक : पिंप्रीत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

August 16, 2023

बीएमसी म्हणतेय, ‘मुंबईत १८ वर्षावरील नागरिकांना लस नका देऊ नका’

April 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group