धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आश्वासक चेहरा तथा शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलचा माजी विद्यार्थी दिपक वाघमारे यांनी आज आपल्या जन्म दिनानिमित्त पी. आर. हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचा संच भेट म्हणून दिला.
याप्रसंगी शाळेच्यावतीने मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी त्यांचा सत्कार करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एनसीसी मेजर डी. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ, शाळेचे माजी विद्यार्थी राजूभाऊ ओस्तवाल, सीताराम मराठे, मनीष चौधरी, सागर भामरे आणि गोटू महाजन यांची उपस्थिती होती.
















