धरणगाव (प्रतिनिधी) येथील संजय नगर मधील माजी नगरसेवक जगदीश धुरेकर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.
जगदीश धुरेकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन भारतीय जनता पक्षात आज जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी भाजपचे जेष्ठ पदाधिकारी शिरिषआप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड.संजयभाऊ महाजन, अॅड. वसंतराव भोलाने, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले, सुनिल चौधरी,चंदन पाटील,कन्हैया रायपूरकर, गोपाल पाटील,रवी पाटील,विकास चव्हाण,कल्पेश महाजन आदी पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.