जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा येथील दोघांना सोमवारी मध्यरात्री बंदुकीच्या धाकावर रिक्षातून आलेल्या सहा संशयितांनी लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दहा तासांत चार संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, देवेंद्र श्यामराव काळे (३७) आणि त्यांचे मित्र मित्र शहा शाहिद शकील या दोघांना सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून रिक्षातून आलेल्या चार संशयितांनी लुटले होते. या घटनेत मोबाइल व रोख रक्कम अशा २२ हजार रुपयांची लुटमार संशयितांनी केली होती. मूळचे पुणे येथील देवेंद्र काळे सध्या कुसुंब्यामध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. ते बांधकाम ठेकेदार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासचक्रे फिरविली. चौघे संशयित हे सुप्रीम कॉलनीतील असल्याची माहिती समोर आल्यानंतर पो.नि. जयपाल हिरे यांच्याम मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सतीश गर्जे, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, मुकेश पाटील, राहुल रगडे यांनी मंगळवारी रात्री सुप्रीम कॉलनीतील चौघांना अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख व रतिलाल पवार हे करीत आहेत.