चाळीसगाव (प्रतिनिधी) ठाण्याचा ढाण्या वाघ तथा दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट धर्मवीर चाळीसगाव शहरात शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांसाठी दि. १९ मे रोजी सकाळी ११:४५ चा एक शो मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
चित्रपट पाहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव येथून सर्व शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी मोटरसायकल रॅलीने राज चित्रपट गृह येथे जाणार आहेत. तेव्हा सर्व शिवसैनिकांनी दि. १९ मे रोजी सकाळी १०:३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव जवळ उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.