धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा मार्गदर्शनातून सामाजिक कार्यकर्ते महेंद्र महाजन (भैया भाऊ) यांचा सौजन्याने धरणगाव शहरात टँकरने नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणी वाटप सुरु आहे.
या शुभ कार्यासाठी भैयाभाऊ मित्र परीवार खुप जोमाने कामाला लागले आहेत. धरणगाव शहरातील नागरिक भैया भाऊ यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. भैयाभाऊ मित्र परिवारातील शेखर महाजन, ज्ञानेश्वर माळी (धाकला), भाऊसाहेब महाजन, प्रशांत देशमुख, अक्षय माळी, महेंद्र वऱ्हाडे, राहुल महाजन, नाना महाजन, रोहित माळी, सतिष वाघ (बाळा भाऊ), सद्दाम सय्यद, राहुल रोकडे, जीवन विसावे, रवीद्र महाजन, भैया भाऊन प्रेम करणारे अनेक मित्र मंडळींचे या कार्याला सहकार्य मिळत आहे.