बोदवड (महेंद्र पाटील) मुंबईतील मादक पदार्थ तस्करी प्रकरणातील फरार आरोपीस शहरातील मणियार वाडा भागातून मुंबई सीआयडी क्राईम पथकाच्या ताब्यात घेतले आहे. या वृत्ताला बोदवड पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
येथील मणियार वाडा भागातून मुंबईतील मादक पदार्थ तस्करी प्रकरणातील सहा महिन्यापासून फरार असलेला आरोपी मुबारक शमसूद्दिन मन्सूरी हा बोदवड येथील मणियार वाडा भागातील साडूच्या घरी चार ते पाच दिवसापासून राहत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या सीआयडी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मुंबई सीआयडी क्राईम ब्रँच युनिट ३ चे ए.पी.आय प्रकाश लिंगे यांच्या पथकाने रविवारी रात्री तीन वाजता बोदवड गाठले. त्याच्यानंतर मणियार वाडा भागातून नातेवाइकांच्या घरून संशयित आरोपी मुबारक शमसूद्दिन मन्सूरी याला ताब्यात घेत पुढील कारवाई साठी मुंबईला नेले. या वृत्ताला बोदवड पोलिसांनी दुजोरा दिला आहे.