TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गॅल गडोट शाहीन बागच्या ‘बिलकीस दादी’वर इम्प्रेस; म्हणाली..’ही आहे खऱ्या आयुष्यातील वंडर वुमन’

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधी आंदोलनाचा चेहरा आणि ‘शाहीनबाग दादी’ म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या बिल्किस बानो पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा सिनेमा ‘वंडर वुमन १९८४’ मध्ये प्रमुख भूमिका निभावणारी प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गडोट हिने बिल्किस बानो यांना खऱ्याखुऱ्या जीवनातील आश्चर्यकारक महिला अर्थात ‘वंडर वुमन’ असं म्हटलंय.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि वंडरवुमनच्या भूमिकेने सर्व जगाला भूरळ घालणाऱ्या गॅल गडोटने शाहीन बागच्या ‘बिलकीस दादी’ला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गॅल गडोटने न्यूईयरच्या निमित्ताने वर्षभरात चर्चेत आलेल्या काही महिलांचे फोटो शेअर केले आहेत. या महिला तिच्या दृष्टीने २०२० मधील वंडर वुमन्स असल्याचं गॅल गडोटने सांगितलं आहे. अशातच तिने आपल्या या खास यादीमध्ये शाहीन बागमधील ‘बिलकीस दादी’ यांचाही समावेश केला आहे. या पोस्टमध्ये गॅल गडोटने इतरही अनेक महिलांचे फोटो शेअर केले आहेत. त्याचसोबत कॅप्शनमध्ये #MyPersonalWonderWomen हा हॅशटॅगही वापरला आहे. २०२०मधील आश्चर्यकारक महिलांचे फोटो शेअर करताना, “काही माझ्या खूप जवळच्या आहेत…काही प्रेरणादायी महिला आहेत…तर काही असाधारण महिलाही आहेत ज्यांची भविष्यात भेट होईल अशी आशा आहे. आपण एकत्र आलो तर अनेक आश्चर्यकारक बाबी करू शकतो”, अशा आशयाचा मेसेज गडोटने लिहिला आहे. गडॉटने शेअर केलेल्या वंडर वुमन लिस्टमध्ये बिल्कीस बानो यांच्याशिवाय अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न, गल गडॉटच्या कुटुंबातील महिला आणि काही मैत्रिणींचे फोटोही आहेत. तसेच गडोटने शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडली असून युजर्स तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

गेल्या वर्षी म्हणजेच, २०२० मध्ये शाहीन बागच्या आंदोलनात ‘बिलकीस दादी’चं नाव खूप चर्चेत आलं होतं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बाग येथे पार पडलेल्या आंदोलनात ८२ वर्षीय ‘बिलकीस दादी’ने उपस्थित राहत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. एवढंच नाहीतर ‘बिलकीस दादी’ला शाहीन बागची दादी म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बाग येथे आंदोलन सुरु होतं. दिवस-रात्र हे आंदोलन सुरु होतं. यावेळी बिलकीस दादी केवळ महत्त्वाच्या क्षणीच नाहीतर, सकाळपासून रात्रीपर्यंत या आंदोलनासाठी उपस्थित राहिली होती. तसेच त्यावेळी बोलताना या आंदोलनाला शेवटपर्यंत पाठींबा देणार असल्याचंही बिलकीस बानो यांनी त्यावेळी सांगितलं होतं. तसेच टाईम मॅगझिनने २०२० च्या १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्येही बिलकीस बानो यांचा समावेश केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड; १३ जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

March 17, 2021

आज आढळले ५७ कोरोना पॉझेटिव्ह ; ३७ निगेटिव्ह !

November 24, 2020

… तर लोकांना मूर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

February 9, 2021

साडेतीन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण, शाळेच्या व्हॅन चालकास अटक !

July 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group