धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील घरकुलपात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०११च्या केंद्रीय सर्व्हे नुसार नांदेड ता. धरणगाव जिल्हा जळगाव येथील घरकुलपात्र ४४ लाभार्थी ब यादीत प्रतिक्षा यादीवर आहेत. त्यांचेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही झालेली आहे. ती अशी
१) घरकुलासाठी शासन निकषानुसार पात्र लाभार्थीसाठी गट नंबर १६३८ नांदेड ग्रामसभेने दि. २६-१-२०२० रोजी ठराव पारीत करून नाहरकत दिलेली आहे.
२) गटविकास आधिकारी धरणगाव यांनी उपरोक्त गट नंबर१६३८ मधील ०.३३ हेक्टर क्षेत्र उपरोक्त पात्र लाभार्थीसाठी असले याबाबत अहवाल दि. २०-३-२०२० रोजी कलेक्टर जळगाव यांचेकडे सादर केलेला आहे.
३) जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपरोक्त ४४ घरकुल पात्र लाभार्थ्यांसाठी नांदेड येथील गट नंबर १६३८ मधील प्रती लाभार्थी ४६.४७ चौ मी (५०० स्क्वेअर फूट) दि. २८-१२-२०२१ रोजी मंजूर केलेली आहे.
४) उप अधिक्षक भुमिअभिलेख धरणगाव यांनी नांदेड येथील गट नंबर १६३८ असे भौगोलिक मोजमाप करून सीमा आलेखन अहवाल नकाशासहित ग्रामविकास आधिकारी आधिकारी नांदेड, गटविकास आधिकारी धरणगाव, तहसीलदार धरणगाव यांचेकडे २३-१-२०२० रोजी सोपवलेला आहे.
५) ग्रामसभा, भुमीअभिलेख उपअधिक्षक, जिल्हाधिकारी यांनी २६-१-२०२० ते २८-१२-२०२१ दोन वर्षे कोणतेही अतिक्रमण नोंदवले गेले नाही. परंतु जून २०२१ मध्ये बीडीओ धरणगाव आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे अतिक्रमण असल्याचे म्हणणे आहे. तसे अपील त्यांनी विभागिय आयुक्त नाशिक यांचेकडे केले आहे. तीन वेळा सुनावणी होऊनही अपिल निकाली काढलेले नाही. यावरून असा निष्कर्ष निघतो की, पात्र लाभार्थ्यांना घरकुल देणेस बीडीओ धरणगाव यांनी त्यांच्या स्तरावरून टाळाटाळ केलेली आहे. आपण आपल्या आधिकारात घरकुल देण्याचे आदेश द्यावेत, असे यात म्हटले आहे.