जळगाव (प्रतिनिधी) ‘त्या’ क्लिप विदेशात सुरक्षित आहेत. त्यामुळे माझ्या शरीराचे तुकडे-तुकडे केले तरी पापाचा घडा फुटेल आणि अपप्रवृत्तींचा नाश होईलच. मला ब्लॅकमेलिंग करायचे राहिले असते तर जनतेसमोर तथ्य मांडली नसती. रात्रीच्या अंधारात चिरीमिरी घेऊन शांत बसलो असतो. परंतू मला अनैतिक प्रवृत्ती संपवायची आहे. अगदी त्यांच्यात हिंमत असेल तर मी त्यांच्या घराच्या गच्चीवर सुद्धा समोरा-समोर चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे मला त्रास दिला तर अशा गोष्टी उघड करेल की महाराष्ट्र हादरेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल लोढा यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांना इशारा दिला आहे. ते ‘द क्लिअर न्यूज’ला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत बोलत होते.
लोढा पुढे म्हणाले की, मी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना काही फोटो दिली होती. ती फोटो सार्वजनिक करू नये, असं सांगितले होते. परंतू त्यांनी ते फोटो वरिष्ठांना दिले. एका मंत्र्याच्या पीएची महिलेसोबतची अश्लील क्लीपच नव्हे तर अख्खी जंत्री माझ्याकडे आहे. तो मंत्री व पीए कशा पद्धतीने काम करतात. तसेच यांचे काळे आणि अनैतिक कृत्य कुठं तरी थांबवीत म्हणून मी दोघांना विनंती केली. परंतू रामेश्वर नाईकने मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संघाचे भैय्याजी जोशी यांच्यासह संघाच्या इतर नेत्यांसोबत माझे संबंध आहेत. तुला आम्ही कुठं संपवून टाकू अशा धमक्या दिल्या. त्यामुळे समाजासमोर चुकीची माणसं उघड पडली पाहिजेत आणि गैरकृत्यांना कुठं तरी आळा बसला पाहिजे असा माझा उद्देश होता.
आजच्या घडीला ‘त्या’ ‘अश्लील क्लिप’चा विषय संपलेला आहे. कारण मी कोणत्याही माता-बहिणीचे आयुष्य बरबाद करू इच्छित नाही. कारण हा विषय सेक्स स्कॅन्डलपेक्षाही भयंकर हा विषय आहे. मी खानदानी सदन परिवारातून आलोय. ब्लॅकमेलिंग करायचे राहिले असते तर जनतेसमोर तथ्य मांडली नसती. म्हणून तर गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. रस्ता अपघातात जीवे आपल्याला ठार मारण्याची धमकी देण्यात येत आहे. परंतू मी अशा धमक्यांना घाबरत नाही.
गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांची अनेक गुपिते आपल्याजवळ आहेत. मला त्रास दिला तर अशा अशा गोष्टी उघड करेल की महाराष्ट्र हादरेल. संघाची काही लोकं रामेश्वर नाईकच्या पाठीशी असल्याचे वाईट वाटते. गिरीश महाजन यांनी घेतलेल्या आरोग्य शिबिरासह इतर भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. सध्या कागदपत्र गोळा करण्याचे काम सुरु आहे. आरोग्य शिबिरच नव्हे तर, इतर खात्यातील देखील अनागोंदी लवकरच उघड आहे. रावणाचाही अंत झाला होता. पण रावणाने किमान सीता मातेला हात लावला नव्हता. परंतू रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजन रावणापेक्षा वाईट आहेत. मी संघ भाजपच्या विरोधात नाही. मी फक्त अपप्रवृत्तीच्या विरोधात असल्याचेही लोढा म्हणाले. गिरीश महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मला व कुटुंबीयांना शासनाने पोलिस संरक्षण द्यावे, असे निवेदन मी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. गत पोलीस अधीक्षक गिरीश महाजन यांना गोटातले होते. परंतू नूतन पोलीस अधीक्षक तरुण होतकरू आहेत. मला त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे लोढा म्हणाले.