नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शाळेच्या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी चक्क दारू पार्टी करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हे विद्यार्थी तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी सरकारी शाळांमधील विद्यार्थी दारुच्या आहारी गेल्याचं दिसत आहे.
ही बस तिरुकाझुकुंद्रम इथून ठाचूर येथे जात होती. त्यावेळी सरकारी शाळेमधील काही विद्यार्थी बसमध्ये बियर पित होते. हे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात अगदी शिवीगाळ करताना देखील दिसत आहेत. दरम्यान त्यांच्यामधल्याच एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वात्र व्हायरल होत असून सरकारी शाळांमधील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या विद्यार्थ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे.