TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांगांना अंत्यदोय योजनेतुन स्वतंत्र शिधापत्रिका द्या : गुलाबराव वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शासनाच्या दि. १७ जुलै २०१९ च्या निर्णयानुसार दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे ३५ किलो धान्य आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात. तसेच त्यांची दारिद्र्य रेषेखाली नाव नोंदणी करावी, असे निवेदन बिलखेडा ग्रामपंचायत व दिव्यांग बांधवांच्यावतीने शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज धरणगावचे नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना देण्यात आले.

नायब तहसिलदार सातपुते यांना निवेदन सादर प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ६० वर्षावरील व्यक्ती, आदिवासी, भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, तसेच कुष्ठरोगी, एचआयव्हीग्रस्त यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याच्या सूचना शासन निर्णयात केलेल्या आहेत. परंतु, अजूनही काही दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बंधू – भगिनींना या शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यांना ३५ किलो धान्य मिळत नाही. काही दिव्यांगांच्या शिधापत्रिका क प्रवर्गात आहेत. या सर्वांचा गाव पातळीवर सर्व्हे करून पात्र दिव्यांगांना नवीन सुधारित शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देऊन ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

आधीच गेल्या फेब्रुवारी २०२० पासून कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील हजारो दिव्यांग, वृद्धांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ठोस असे उत्पन्न नाही. त्यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही दिव्यांगाची शिधापत्रिका असून देखील पैशाअभावी खरेदी करता आलेली नाही. इतकी हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्वांच्या शासनाने गांभीर्याने विचार करून त्यांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका आणि ३५ किलो धान्य द्यावे. तसेच त्यांची नावे दारिद्र्य रेषेखाली यादीत नोंद करून घ्यावेत. अन्यथा दिव्यांगाना नाईलाजाने त्यांच्या हक्काचे धान्य व शिधापत्रिका मिळण्यासाठी मोर्च्या व आंदोलन करायला भाग पाडू नये. असेही गुलाबराव वाघ यांनी बिलखेडा ग्रामपंचायतचे ग्रामस्थ, दिव्यांग बांधव आणि शिवसेना पक्षाच्यावतीने निवेदन सादर प्रसंगी सांगितले.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या जनाआक्का ताई बोरगाव, शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते नंदलाल महाजन, लोकमतचे प्रतिनिधी लक्ष्मण माळी तसेच बिलखेडा येथील गोपाळ नवल भदाणे, सचिन भदाणे, रावसाहेब भदाणे, शिवाजी भदाणे, शालिक काटे, ओंकार भदाणे, राजेंद्र काटे, नंदू भदाणे, मोहन भदाणे, देविदास बडगुजर, सोमनाथ ठाकरे, वैभव भदाणे, गौरव भदाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

एकोपा हा गावाच्या विकासासाठी दिशादर्शक : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपाच्या २० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

September 27, 2025

मजुरीच्या पैशांवरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

July 11, 2025

शरद पवारांबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं केंद्राला पत्र

May 18, 2021

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group