धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी आर हायस्कूलचे शिक्षक गणेशसिंह सूर्यवंशी हे ग्लोबल शिक्षक झाले आहेत. इको ट्रैनिंग सेंटर, स्वीडनतर्फे आयोजित इंडिया बांग्लादेश टेली कोल्याबोरेशन प्रोजेक्ट यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केले. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनीचे सन्मान पत्र नाशिक विभागाचे पदवीधर आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थितीत सूर्यवंशी यांना ग्लोबल टीचर सन्मान प्रदान करण्यात आला.
त्यांच्यासोबत भूमिका सूर्यवंशी, पल्लवी सोनवणे, वैशाली रावतोले, नीरल चव्हाण, अभिजित देशपांडे, तेजेँद्र सूर्यवंशी, पूर्वा आदी सहभागी विद्यार्थी होते व इतर विद्यार्थ्याचा ग्लौबल स्टूडेंट्स म्हणून गौरविण्यात आले. जगाच्या शाश्वत विकासाचे ध्येय या संयुक्त राष्ट्रे २०३० अंतर्गत युनिसेफच्या माध्यमांनी शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, भूक, गरिबी याविषयी बांग्लादेश शिक्षकांशी चर्चा केली. यामुळे विद्यार्थ्यांना संधी मिळाली. या प्रकल्पात वर्चुअली टुरच्या माध्यमाने शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक सांस्कृतिक वारसाची देवाण घेवाण केली.
इको ट्रेनिंगचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. योगेश सोनवणे, बांग्लादेश राष्ट्रीय समन्वयक आयेशा सिद्दीकी, इ टी सी ग्लोबल स्विडेनचे जनरल सेक्रेटरी इज्जत हसन, इंग्लीश टीचर्स वेल्फेअरचे अध्यक्ष डॉ. भरत शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पी एच डी प्राप्त शिक्षकांचा सत्कार केला.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण कुळकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारिया, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजिवकुमार सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस एस पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे सी के पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस पाटील तर आभार डी के चौधरी यांनी केले.