धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करतात आला. याप्रसंगी बैलपोळा सणाचे देखील महत्व विषद करण्यात आले.
हिंदी विषय शिक्षिका भारती तिवारी यांनी हिंदी भाषेचा इतिहास, समृद्ध साहित्य परंपरा, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील हिंदीचे योगदान, नामवंत साहित्यिक, हिंदी देश जोडण्याचं माध्यम आदी मुद्यांवर प्रकाश टाकला. तिवारी मॅम यांनी हिंदी भाषेचा गौरव करणारे गीत सादर केले त्यावेळी श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. याप्रसंगी ज्ञानदा पाटील, राम कासार, नक्षत्रा पाटील, अंजली बडगुजर आदी विद्यार्थांनी आपल्या मनोगतातून व कवितांच्या माध्यमातून हिंदी भाषेची थोरवी वर्णन केली.
कार्यक्रमाला प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन भारती तिवारी यांनी केले.