TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

समग्र शिक्षा अभियान – दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साहित्यांचे वितरण

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – “शासन दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र केवळ शासनानेच नव्हे, तर समाजातील सेवाभावी संस्था, उद्योग आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला पाहिजे. दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास हेच सर्वात मोठे समाधान आहे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी हा समाजाची अमूल्य संपत्ती आहे. योग्य संधी, आधुनिक साधने आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे अनेक प्रेरणादायी उदाहरणे समाजात आहेत. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर समानतेच्या, सन्मानाच्या आणि विश्वासाच्या भावनेने पाहण्याची गरज आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील ३८ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, सी.पी. व्हीलचेअर, डिजिटल श्रवणयंत्रे, टीएलएम किट, रोलॅटर, वॉकिंग स्टिक तसेच इतर सहाय्यभूत साहित्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय १५ मतिमंद विद्यार्थ्यांना विशेष एमआर किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी केले. यावेळी त्यांनी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांची उद्दिष्टे तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सुशील पवार यांनी केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, माजी सभापती पती जनाआप्पा कोळी, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, अल्लाउद्दीन बेलदार, विजय पवार यांच्यासह समग्र शिक्षा अभियान व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी लाभार्थी, त्यांचे पालक तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
Next Post

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचावर प्राणघातक हल्ला, पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा ; चार संशयित अटकेत !

April 18, 2024

शासकीय आयटीआयमध्ये ११ डिसेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा !

December 6, 2023

“मला भारतरत्न देण्याचं कॅम्पेन थांबवा” : रतन टाटा

February 6, 2021

चोपडा येथील प्रणीत पाटीलला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्कार जाहीर !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group