धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिक्षक सागर गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. अतिशय संघर्षमय परिस्थितीतून मार्गक्रमण करून बाबासाहेबांनी या देशाचे भवितव्य घडविले म्हणूनच बाबासाहेबांना भारताचे व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. दिन दुबळ्यांना, स्रियांना, वंचितांना त्यांचे न्याय – हक्क मिळवून देणारे बाबासाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने प्रज्ञासूर्य होते ज्यांनी कित्येक अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे कार्य केले. इतिहासतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी नेते, कामगार नेते, प्रचंड विद्वान, ज्ञानसूर्य, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य शब्दबद्ध करणं शक्य नाही.
कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, हर्षाली पुरभे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.