धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांनी आज लाडली ता. धरणगाव लाडकेश्वर महादेव मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली.
लाडली हे पालकमंत्र्यांचे मूळ गाव असून दर वर्षी न चुकता महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. महाराष्ट्रातून कोरोनाचे उच्चाटन व्हावे आणि सर्व नागरिकांना निरोगी आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली