जळगाव (प्रतिनिधी) येथील सिंधी कॉलनी परिसरातील समाधान टॉवर जवळ सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून गुटखा व सुंगधीत तंबाखु असा ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना गुप्त बातमीदाराने सिंधी कॉलनीत गुटखा विक्री होत असल्याची माहिती कळवल्यावरुन परिविक्षाधीन डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह सहाय्यक फोजदार आनंदसींग, जितेंद्र राजपुत, विजय नेरकर अशांच्या पथकाने छापा टाकला. यात महेंद्र गोवरर्धनदास होतूमलानी (वय-५१) यांच्या ताब्यात दोन गाठोडे विमल पान मसाला, व्हि-वन सुगंधी तंबाखुचा साठा मिळून आला असून पथकाने मालासह संशयीतास अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.