TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महामार्गाच्या नूतनीकरणाचा ग्रामीण भागासह कॉलनीतल्या नागरिकांना होणार लाभ !

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन; गिरणेवरील पुलाचे कामही लागणार मार्गी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वार पर्यंत महामार्गाच्या नूतनीकरणाचा लाभ ग्रामीण भागासह जळगावातील कॉलनी परिसरातील जनतेला होणार असून या माध्यमातून गत निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनाची पूर्ती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तर गिरणेवरील नवीन पुलाचे काम सुध्दा लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. ना. पाटील यांच्या हस्ते नूतनीकरणाच्या कामाचे उदघाटन झाल्यानंतर ते बोलत होते.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गावरील खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वारपर्यंत नूतनीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दि. ६ मार्च शनिवारी सकाळी बांभोरी प्र.चा. आणि खोटेनगर स्टॉप येथे करण्यात आले. जळगाव शहरातून जाणार्‍या सुमारे आठ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा पाळधीतून एक मार्ग वळवण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उर्वरित सुमारे ४ किलोमिटर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच या मार्गावरील वीज खांब व इतर उपकरणांचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. या दोन्ही कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या दोन्ही कामांसाठी १२ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून याचे काम आजपासूनच सुरू करण्यात आले आहे.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आश्‍वासनाची वचनपूर्ती

या कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गाचे रूंदीकरण सध्या सुरू आहे. तथापि, खोटेनगर स्टॉप ते पाळधी बायपास आणि कालिकामाता मंदिर ते तरसोद प्रवेशद्वार या मार्गाचा यात समावेश नव्हता. यामुळे पालकमंत्री या नात्याने आपण या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी १२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून यामुळे या महामार्गावरील रहदारीला होणारा अडथळा दूर झाला आहे. यात खोटेनगर ते पाळधीपर्यंतचा रस्ता हा अतिशय अरूंद असून याला आधी अर्थिक तरतूद नव्हती. मात्र आता याबाबत पाठपुरावा करून हे काम आजपासून सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीत आपण महामार्गाच्या रूंदीकरणाची वचन दिले होते. आजपासून याची पूर्तता होत असल्याचे प्रतिपादनही ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

गिरणेवरील समांतर पुलाचे कामही लवकरच होणार

दरम्यान, गिरणा नदीवर असणार्‍या पुलाच्या समांतर एक नवीन पूल उभारणीच्या कामाचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रूपये लागणार असून या पुलासाठी लवकरच मान्यता मिळेल असा आशावाद देखील ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यामुळे महामार्गावरील रहदारीची अडचण दूर होणार असल्याचे प्रतिपादनही ना. पाटील यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार सा.बा.चे शाखा अभियंता जितेंद्र महाजन यांनी मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सा.बा.तर्फे व कॉन्टॅक्टर राहुल सोनवणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर भारती सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व मान्यवरांचा शाल श्रीफळ व गुलाबबुके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, मनपा गटनेते सुनील महाजन, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनोज चौधरी, प्रशांत नाईक, अमर जैन, गणेश सोनवणे, श्याम कोगटा, सा. बा. विभागाचे सुभाष राऊत, शाखा अभियंता जितेंद्र महाजन, कॉन्ट्रॅक्टर राहुल सोनवणे, पं. स. सदस्य जना आप्पा कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

नंदगावचा भुमीपुत्र असलेल्या पोलीस निरीक्षकाचा ग्रामस्थ व हभप ईश्वरदास महाराजांनी केला गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लज्जास्पद : बापानेच टाकले मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १० अश्लील व्हिडीओ !

September 20, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ !

November 8, 2024

जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार ताब्यात !

March 19, 2024

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group