धरणगाव (प्रतिनिधी) आज राष्ट्रीय लसीकरण दिवसानिमित्ताने धरणगाव येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सेविका तसेच आशा सेविका यांना प्रमाणपत्र देऊन तहसीलदार नितीनकुमार देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे, डॉ लीलाधर बोरसे, डॉ तुषार जोगी सोनवाद, डॉ अभिजित नन्ननवरे साळवा यांचा मार्फत कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
तसेच मार्गदर्शन तहसीलदार नितीन देवरे तसेच डॉ.संजय सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी यांनी केलं. सूत्रसंचलन डॉ अभिजीत नन्ननवरे यांनी केलं तर आभार अरुण वारुळे आरोग्य सहाय्यक यांनी केलं तसेच जे एस राव सहाय्यीका, नितीन भिरारी लिपिक, नंदू चौधरी, तुषार खंडारे, सुनील पाटील, भूषण पाटील, अनिल बडगुजर, निलेश पाटील, मनीषा पाटील तसेच सर्व आशा सेविका उपस्थित होते.