पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील पाळधी ग्रामपंचायतमधील स्वच्छता कर्मचारींना दिवाळी भाऊबीजच्या निमित्ताने पुष्पगुच्छ, शाल, मिठाई बॉक्स तर महिला कर्मचाऱ्यांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या काळात पाळधी शहरातील आरोग्य प्रशासनासोबत जीवाची पर्वा न करता ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी फवारणी, परिसर सील करणे, गावात स्वच्छता राखणे अशी महत्वपूर्ण कामे केलीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा अखिल भारतीय जिवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे धरणगाव तालुकाध्यक्ष गोपाळराव सोनवणे यांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी पाळधी शहरातील आशा वर्कर यांना रुग्ण कल्याण समिती सदस्य दिपकराव सावळे यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. तर ‘वर्ल्ड व्हिजन’ संस्थेतर्फे सर्वांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह धरणगाव पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, पाळधी खुर्दचे सरपंच चंदू माळी, उपसरपंच अनिल कासट, श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासट, उद्योगपती दिलीप पाटील, माजी सभापती राजू पाटील, डेप्युटी सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य धर्मेन्द्र कुंभार, किशोर सोनवणे, अखिल भारतीय जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगार, किरण नांद्रे, जिल्हा संघटक भगवान मराठे, भूषण महाजन, अलीम देशमुख, दीपक झंवर, एपीआय हनुमंतराव गायकवाड यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सेनेचे शिवाजी पाटील, मुकेश भोई, दीपक श्रीखंडे, हिम्मत कुंभार, सुभाष कापुरे संतोष सोनवणे, पिंटू कोळी गोकुळ पाटील, बबलू पाटील ,सादिक देशमुख , महेंद्र चौधरी असलम मण्यार, महेश मोरे, शामकांत फुलपगार, नितीन फुलपगार यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन आधार पाटील यांनी केले.
















