साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२ : आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?
मेष राशी :-
तब्येत जपा. परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रसंगी जुळवून घ्यावे लागेल. कायदा पाळा आणि वाद टाळा. प्रसंगी कठोर शब्द वापरावे. कामात प्रभाव जाणवेल. हुशारी दिसून येईल. दांपत्य जीवन आणि कौटुंबिक जीवन सुखी होईल. शुभ रंग – गुलाबी
वृषभ राशी :-
कायदा पाळा आणि वाद टाळा. हातून चुकीची कृती होऊ देऊ नका. समजून घेऊन कृती करा. कोणाच्याही हातातील बाहुले होणे टाळा. सावध राहा. एकाग्रता महत्त्वाची आहे लक्षात ठेवा. थांबला आणि विसंबला त्याचा कार्यभाग संपला याची जाणीव ठेवून नियोजन करा. प्रवासाचा योग आहे. माणसं जोडायला आणि ओळखायला शिका. कोणाला किती जवळ किंवा दूर करावे हे कळले तर फायदा होईल. शुभ रंग – पांढरा
मिथुन राशी :-
आर्थिक प्रगती होईल. स्वावलंबनावर भर द्या. जवळच्यांसाठी वेळ काढाल. चर्चेतून प्रश्न सोडवाल आणि वाद टाळाल. संधी साधाल आणि प्रगती कराल. कायदा पाळणे हिताचे. शुभ रंग – हिरवा
कर्क राशी :-
वाद टाळणे आणि अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे आणि व्यवस्थित नियोजन करून काम करणे आवश्यक. कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे. घरच्यांना वेळ द्या. नव्या ओळखी होतील. कायदे पाळणे हिताचे. गोड बोलाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग – चंदेरी
सिंह राशी :-
वास्तवाचे भान राखणे, कोणाच्याही आहारी जाणे टाळणे हिताचे. बुद्धि वापरा. चातुर्य वापरा. परिस्थितीचा अंदाज घेऊन वागणे आणि गोड शब्दात संवाद साधणे हिताचे. कायदा पाळा आणि वाद टाळा. प्रियजनांना वेळ द्याल. शुभ रंग – नारिंगी
कन्या राशी :-
अतिरेक टाळणे हिताचे. नियोजन करून काम किंवा अभ्यास करणे हिताचे. प्रिय व्यक्तींना वेळ द्या त्यांच्याशी संवाद साधा. प्रभाव पाडू शकाल. तणाव व्यवस्थापन लाभाचे. वाद टाळणे हिताचे. शुभ रंग – मोरपिशी
तूळ राशी :-
कायदा पाळणे आणि वाद टाळणे हिताचे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे. धोकादायक कामं टाळा. माणसांना जपा. सावध राहा. आर्थिक नियोजन लाभाचे. तब्येत जपा. शुभ रंग – आकाशी
वृश्चिक राशी :-
घरच्यांना वेळ द्या. प्रतिष्ठा जपण्यावर भर द्याल. हुशारीने वागाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे. सावध राहणे. बोलताना कोणी दुखावणार नाही याची काळजी घेणे हिताचे. वेळेचे नियोजन महत्त्वाचे आणि तब्येतीला जपणे हिताचे. शुभ रंग – गुलाबी
धनु राशी :-
काम प्रामाणिकपणे करत राहणे हिताचे. वेळेचे नियोजन आणि आर्थिक नियोजन हिताचे. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. हुशारीने वागाल. कष्टांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. संवादाने प्रश्न सोडवणे हिताचे. प्रवासाचा आणि मिष्टान्न्चा योग आहे. शुभ रंग – पिवळा
मकर राशी :-
वाद टाळणे हिताचे. प्रेमाने वागणे आणि गोड बोलणे हिताचे. कौटुंबिक कलह टाळणे हिताचे. प्रेमाच्या व्यक्तीसाठी वेळ काढा. मुलांनी अभ्यासावर भर द्यावा. सावध राहा आणि मिळालेलेली संधी साधा. झेलेल तेवढे काम करा. सहकाऱ्यांशी गोड बोला. शुभ रंग – राखाडी
कुंभ राशी :-
तब्येत जपणे, वाद टाळणे आणि कायदा पाळणे हिताचे. ओळखीतल्यांची साथ लाभेल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. प्रेमात संवाद साधणे हिताचे. वातावरण आनंदी राखण्यावर भर देणे हिताचे. प्रसंगी माफी द्या पण वाद वाढणार नाही हे बघा. शुभ रंग – राखाडी
मीन राशी :-
घरच्यांना वेळ द्या. ज्येष्ठांना जपा. तब्येत सांभाळणे आवश्यक. चुकीची कृती टाळणे लाभाचे. व्यसनं टाळा. कायदेशीर प्रश्न हुशारीने सोडवाल तर फायद्यात राहाल. करार आणि आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि नीट वाचून तसेच समजून घेऊन करणे हिताचे. कतृत्व गाजवाल. शुभ रंग – सोनेरी