नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुरुग्राममधून एक भयानक घटना समोर आलीये. एका निवृत्त सैनिकाने आपल्या आपल्या सूनेची हत्या केली. विशेष म्हणजे आरोपी सासऱ्याने सुनेचा प्रियकर, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन्ही मुलांची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी सासऱ्याचं नाव राय सिंह असं आहे. त्याने आपल्या घराच्या वरच्या खोल्या एका कुटुंबाला भाड्याने दिल्या आहेत. त्या खोल्यांमधील एका पुरुषासोबत त्याच्या सूनेचं अनैतिक संबंध होते. राय सिंहने दोघांना एकदा रंगेहात पकडलं होतं. त्यामुळे त्याच्या संतापाचा पारा चढला होता. त्याने दोघांचा काटा काढायचं ठरवलं होतं. त्यामुळे तो गेल्या सहा ते सात महिन्यांपासून त्यांच्या हत्येचा कट आखत होता. अखेर त्याने आपल्या सूनेची हत्या केली. यासोबतच त्याने सुनेचा प्रियकर, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन्ही मुलांची हत्या केली. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी आरोपीने आपल्या मुलाला काही कामानिमित्त बाहेरगावी पाठवलं. त्यानंतर पाच जणांची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी जेव्हा आरोपीला मुलांची काय चूक होती, त्यांचा खून का केला? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं संगोपन कोण करतं या विचाराने आपण हत्या केली, असा कबुलीजबाब आरोपी राय सिंह याने दिला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.