नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात सध्या पेगसास प्रकरण प्रचंड गाजत आहे.त्यामुळं तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना, फोन हॅक झाला आहे की, नाही? हे कसे ओळखाल ?. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा आपल्या मोबाईल डिव्हाइसमध्ये पाच बदल झाली असतील. त्यामुळं आपल्या मोबाईल डिव्हाइसमधील ते पाच बदल कोणते ?, हे जाणून घेऊ या !
सगळ्यात पहिले आपण पाहू की हॅकिंग म्हणजे काय ? खरे तर ती कोणतीही वेगळी गोष्ट नाही. खऱ्या जीवनात देखील आपण अशा गोष्टी कायम पाहत असतो. अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्याशी संबंधित माहिती मिळविणे आणि वापरणे. जो अशी गोष्ट करतो त्याला हॅकर म्हणतात.
फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे ओळखाल ?
१. जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी नेहमीच्या तुलनेत अधिक वेगाने समाप्त होत असेल तर फोनमध्ये मॅलवेअर अथवा बनावट अॅप असू शकते. निष्कर्षावर पोहचण्याआधी तुम्ही बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अॅप देखील तपासून पाहावेत. अनेकदा बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या अॅपमुळे देखील बॅटरी लवकर समाप्त होते. त्यामुळे हे अॅप बंद करावे व त्यानंतर पाहावे.
२. जर तुमचा मोबाइल अचानक स्लो झाला असेल अथवा वारंवार हँग होत असल्यास डिव्हाइसच्या बॅकग्राउंडमध्ये मॅलवेअर असू शकते. त्यामुळे फोनला त्वरित फॅक्ट्री रीसेट करावे. यामुळे मॅलवेअर अॅप डिलीट होतील.
३. जर तुमच्या फोनमध्ये अॅप ओपन केल्यावर वारंवार क्रॅश होत असेल अथवा वेबसाइट लोड होण्यास नेहमी पेक्षा अधिक वेळ लागत असल्यास तुमचा फोन हॅक झाला असण्याची देखील शक्यता आहे.
४. अनेकदा आपण एखादा अॅप अथवा वेबसाइटवर गेल्यावर अचानक पॉपअप-जाहिरात दिसते. कदाचित तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर असण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी अॅप वापरणे टाळावे. असे केल्यास तुमचा फोन आणि खासगी डेटा सुरक्षित राहिल.
५. तुम्ही मोबाइल वापरत नसताना देखील डिव्हाइसची फ्लॅश लाइट सुरू होत असल्यास कदाचित हॅकर तुमच्या फोनला कंट्रोल करत असण्याची शक्यता आहे.
















