धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा येथील शेकडो मुस्लिम कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधून आपण जाती – पाती पेक्षा केलेल्या विकास कामांमुळे पाठींबा देवून शिवसेनेत प्रवेश केला. तर धरणगाव तालुक्यातील साळवा येथील असंख्य युवकांनी शिवसेनेच्या ध्येय धोरण स्वीकारून पाळधी येथे असंख्य युवकांनी हाती भगवा घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दिवसेंदिवस जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील वरचढ ठरत असून तर विरोधकांची धाक – धुक वाढली आहे.
साळवा येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !
पाळधी येथे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा उपस्थिती मध्ये साळवा येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यात युवानते सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ अहिरे, विशाल गोपाळ नारखेडे, निखिल योगराज फिरके, दीपक वासुदेव डोळे , पराग सुरेश नेहते, केतन पंढरीनाथ भोळे, किशन धनंजय इंगळे,विशाल नारखेडे, दीपक कोल्हे यांच्यासह असंख्य युवकांनी हाती भगवा घेत सेनेत प्रवेश केला. यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, कुणाल इंगळे, अमोल पाटील, अनिल माळी, नवल पारधी, प्रशांत झंवर, आबा माळी आदी उपस्थित होते.
यावेळी शेख इस्माइल, सलीम खान, सत्तार मामू, दानिश शेख , शेख मुजम्मिल, फिरोज खान, आरिफ खान, जावेद शेख, जफर भाई ट्रांसपोर्ट वाले, सदाकत भाई शोएब खान, उजैर देशमुख, नविद शाह, इकबाल पटेल ,मोहसिन खान, समीर शेख, मोहसिन भाई अजंता, जुबेर, समीर शेख, रहीम, तुहिद, उबैद, तनवर, सलीम शाह रहीम खान, अलीम, शोएब सैय्यद, आसिफ खान, आसिफ शेख, यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधून शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उपस्थित मण्यारखेड्याचे राजू पाटील, सरपंच पिंटू भाऊ पाटील, शिवसेना महानगर प्रमुख संतोष आप्पा पाटील, नारायण आप्पा कोळी, मुकुंदराव नन्नवरे, आबा माळी, दानिश पठाण उपस्थित होते.