TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विहिर धसल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली पती-पत्नी ठार ; जेसीबीने काढले मृतदेह !

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2024
in गुन्हे, शिरपूर
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपुर (वृत्तसंस्था).तालुक्यातील जोयदा शिवारातील एका शेतात विहिर धसून दाम्पत्य दाबले गेल्याने ठार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने नातवासह आजी सुखरुप बचावले. तब्बल ४ तासानंतर जेसीबी मशिनद्वारे दाम्पत्याचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी रेबा पांगल्या पावरा (५०) व त्यांची पत्नी मिनाबाई रेबा पावरा (४५) हे दाम्पत्य जोयया शिवारातील लाल मातीजवळ स्वतःच्या शेतात झोपडीवजा घरात राहत होते. काल (दि.२७) सकाळपासून रेवा व मिनाबाई हे दोघे शेतात ज्वारी पेरणीचे काम करीत होते. मात्र, दुपारी १२ वाजेच्या सुमारास मिनाबाई यांचे पोट अचानक दुखू लागल्यामुळे दोघे काहीवेळ झोपडीत चहा पिण्यासाठी आले. त्यानंतर दोघे शिरपूर येथे उपचारासाठी जाणार होते. त्यामुळे शेजारी राहणारे भिकला रिच्या पावरा व संतुबाई भिकला पावरा (५०) या दोघांना उर्वरीत पेरणीचे काम करण्यास सांगितले होते.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

भिकला पावरा, संतुबाई पावरा, त्यांचा नातु तेजस किरण पावरा (दीड वर्ष) हे तिघे रेबा पावरा यांच्या झोपडीजवळ थांबले होते. विहिरीतून आला मोठा आवाज चहा होत असतांना दुपारी १२.३० वाजता अचानक विहिरीतून मोठा आवाज आला. त्यामुळे रेबा व मिनाबाई हे दोघे विहिरीकडे धावले. त्यावेळी विहिरीचा काही भाग धसू लागला. रेबा व मिनाबाई पावरा हे दोघे विहिरीजवळ उभे असतांनाच काही क्षणातच विहिर धसली व दोघे पती-पत्नी विहिरीत पडल्याने ढिगाऱ्याखाली दाबले गेले. त्यावेळी संतुबाई पावरा तेजस पावरा, भिकला पावरा हे तिघे देखील विहिरीजवळ गेले असता संतुबाई पावरा या देखील कमरेपर्यंत मातीच्या ढिगाऱ्यात बुजल्या गेल्यात. त्यांनी नातवाला डोक्यावर धरल्यामुळे तो सुखरुप वाचला. त्या दोघांना भिकला पावरा यांनी माती उपसून सुखरूप बाहेर काढले. मात्र, रेखा व मिनाबाई हे दोघे मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णतः गाडले गेले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती भिकला पावरा यांनी जवळील रहिवाशांसह जोयदा व सांगवी गावात कळविली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. महसूल अधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. पीड ते दोन तासानंतर जेसीबी मशिन आणण्यात आले. सुमारे चार तासांनी दुपारी ४.३० वाजता विहिरीतून रेवा व मिनाबाई पावरा या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तोपर्यंत गटविकास अधिकारी संजय सोनवणे, नायब तहसिलदार अधिकार पेंढारकर, मंडळ अधिकारी प्रवीण मराठे, तलाठी प्रकाश पावरा, सरपंच शिला पावरा, ग्रामसेवक ईश्वर पावरा तसेच शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली. दाम्पत्याचे मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच संतुबाई पावरा, त्यांचा नातु तेजस पावरा यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आ. अमरिशभाई पटेल यांचे स्वीय सचिव अशोक कलाल, जि.प. सदस्य योगेश बादल यांनी रुग्णालयात भेट देवून जखमींची विचारपूस केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Vihira dhasalyānē mātīcyā ḍhigāṟyākhālī patī-patnī ṭhāra; jēsībīnē kāḍhalē mr̥tadēha!

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

प्रशिक्षण होऊनही प्रमाणपत्र नाही ; शिक्षक सहा महिन्यापासून प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ७० कोरोना बाधित !

September 16, 2020

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती !

March 25, 2021

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीचा प्रथम विजेते !

July 15, 2024

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावच्या श्रीजी जिंनिंगमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ ; ११, १५३ रुपयाचा भाव !

August 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group