जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक येत्या १८ मार्चला होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक फुटल्याने भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. त्या पार्श्वभूमीवर जळगाव भाजप नगरसेवक अमित काळे यांनी एक खुलासा केला आहे की, मी भारतीय जनता पक्षात आहे, मी फुटलेलो नाही. तसेच मी पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनाही सांगितले आहे. असं काळे म्हणाले.
जळगाव महापालिका महापौर उपमहापौर निवडीचे राजकारण तापू लागले आहे. महापालकेत भाजपची सत्ता आहे. पक्षाचे ५७ नगरसेवक आहेत. त्यापैकी ३१ नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेशी संपर्क साधला आहे. सध्या हे नगरसेवक ठाणे येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपचे नगरसेवकही नाशिक येथे आहेत.
फुटलेल्या नगरसेवकांची नावे बाहेर येवू लागली आहेत. यात नगरसेवक अमित काळे यांचे नाव आहे. या बाबत काळे यांनी खुलासा केला की, “मी भारतीय जनता पक्षातच आहे. मी बाहेर पडलो नाही. माझ्या घराच्या प्रॉब्लेम मुळे मी भाजप नगरसेवकांबरोबर गेलो नाही. मी घरीच आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनाही मी सांगितले आहे.