TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लॉकडाऊन टाळायचा असेल तर काही बंधने पाळावीच लागतील : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरीकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे इशारा वजा आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची तातडीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिलहा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हाधिकारी तुकारात हुलवळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ रावलाणी यांचेसह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

राज्यातील अकोला, नाशिक, अमरावती, नागपूर, जळगावसह काही जिल्हयात कोरोनाचे पुन्हा रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांचेशी व्हीडीओ कॉनफरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करुन तातडीने काही बंधने लावण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणेला दिले.

मास्क नाही तर प्रवेश नाही

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉन्स, मंगल कार्यालये, मॉल्स, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक प्रवाशी वाहतुक करणाऱ्या यंत्रणा या गर्दीच्या याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिलेत. जे नागरीक मास्क वापरणार नाहीत, त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस विभागास दिले.

गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन

नागरीकांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, महापालिका, नगरपालिका, पोलीस विभागाने गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी देतांना १०० व्यक्तींची मर्यादा ठरवून द्यावी, अन्यथा अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येवू नये. परवानगी दिलेल्या कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. विना मास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत.

सार्वजनिक आस्थापनांनी कोरोनांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक

बाजारातील वाढती गर्दी लक्षात घेता सार्वजनिक आस्थापनांनी ग्राहकांना मास्क वापरण्याची सक्ती करावी, तसेच दुकानात सॅनिटायझरची व्यवस्था करावी, सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. मॉलस्, हॉटेल, उद्याने व सार्वजनिक समारंभामध्ये मास्क असल्याशिवाय परवानगी देण्यात येवू नये. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

नागरीकांनी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन जिल्ह्यात कोरोना पुन्हा प्राद्रुर्भाव होणार नाही यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच पुढील सात दिवसात रुग्ण संख्येत सतत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास जिल्ह्यात लॉकडाऊनसारखा पर्याय अवलंबवा लागेल, असा इशाराही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

महसूल विभागची महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडक मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोजगार प्रश्‍नासंदर्भात युवक कॉंग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

September 11, 2020

नवीन कृषी वीज धोरणाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

December 22, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य २४ ते ३० जुलै २०२२ !

July 24, 2022

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंना पुन्हा कोरोनाची लागण !

February 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group