भुसावळ (प्रतिनिधी) कसारा रेल्वेस्थानकानजीक मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे जवळपास दहा रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे :
क्र. १२१११ मुंबई- अमरावती व क्र. १२१०५ मुंबई-गोंदिया एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या कल्याण, पुणे, दौंड, मनमाडमार्गे जळगाव व भुसावळकडे येतील. क्र. १२१३७ मुंबई- फिरोजपूर पंजाब मेल, क्र. १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो, क्र. १२८०९ मुंबई- हावडा एक्स्प्रेस, क्र. १२३२२ मुंबई-हावडा एक्स्प्रेस, क्र. १८०२९ एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस, क्र. १२१६७ एलटीटी-वाराणसी एक्स्प्रेस आणि क्र. १२१४१ एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्या दिवा, वसई, उधना, जळगाव आणि भुसावळमार्गे पुढे मार्गस्थ होतील. क्र. १७०५७ मुंबई- सिंकदराबाद एक्स्प्रेस ही गाडी कल्याण, कर्जत, पुणे, दौंड, मनमाड, जळगाव, भुसावळमार्गे पुढे रवाना होणार आहे.
मालगाडीचे पाच डबे घसरले !
रविवारी संध्याकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे पाच डबे घसरले. दोन डब्यांचे कपलिंग तुटल्याने ते दुसऱ्या रेल्वे मार्गावर उलटले. यामुळे नाशिककडे आणि नाशिकहून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहेत.