बोदवड (प्रतिनिधी) मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. या घटनेच्या निषेधार्थ बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यातर्फे तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मार्फत नायब तहसीलदार बी.डी पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तहसीलदार यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी याची मागणी करण्यात आली, सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरूष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय काकडे तालुका अध्यक्ष निवृत्ती ढोले कार्याध्यक्ष संतोषसिंग राणा प्रमोद गायकवाड युवक अध्यक्ष संदिप पाटील शहर युवक अध्यक्ष शैलेश वराडे गोकुळ पाटील गणेश पाटील दिपक खराटे विद्यार्थी आघाडी चे अभि पाटील अनुराग भारंबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.