TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुजरातमध्ये यापुढं ड्रॅगन फ्रूटचं नवं नाव असेल ‘कमलम’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ड्रॅगन’ हे फळ तुम्हाला माहीत असेलच… पण गुजरातमध्ये मात्र हे फळ ‘ड्रॅगन’ नावानं नाही तर ‘कमलम’ (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार असल्याची घोषणा केली.

एखाद्या चौकाचं, ठिकाणाचं अथवा शहराचं नाव बदलण्यासाठी सरकार आणि नेतेमंडळी आग्रही असतात. त्यामुळेच ते अनेकदा चर्चेत देखील असतात. गेल्या काही दिवसांपासून शहरांच्या नामांतराची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आता शहरांवरून हा मोर्चा फळांकडे वळवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये थेट फळाचं नाव बदलण्यात आलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता ड्रॅगन फ्रूट कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली आहे. ड्रॅगन फ्रूट या नावाने प्रसिद्ध असलेलं फळ यापुढे गुजरातमध्ये “कमलम” म्हणून ओळखलं जाणार आहे. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. “राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याचा बाहेरून आकार हा कमळासारखा आहे. त्यामुळेच आता ड्रॅगन फ्रूटचं नाव हे कमलम असं ठेवण्यात आलं आहे. आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचं नाव बदललं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला” असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्यामागे कोणतंही राजकारण नसल्याचं देखील विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील काही भागात शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करतात. या भागात मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जातं. ड्रॅगन फ्रूटचे अनेक फायदे आहेत. रक्तदाब, मधुमेह, शारीरीक पेशींचा ऱ्हास यासारख्या आजारांना प्रतिकार करणारे फळ म्हणून ड्रॅगन फ्रूट लोकप्रिय आहे. त्यामुळे आता ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही वर्षांत गुजरातच्या कच्छ आणि नवसारी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फळाचं उत्पादन घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै २०२० रोजी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात या फळाचा उल्लेख केला होता. तसंच गुजरातमध्ये भाजप कार्यायलयाचं नावही ‘कमलम’ आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताण-तणावामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आजारांवर इतर विशेष उपचारांसह प्रतिबंधक उपाय म्हणून ड्रॅगन फ्रूट उत्तम पर्याय असल्याचं मानलं जातं. ड्रॅगन फ्रूट रोगप्रतिकारक शक्ति मजबूत करतं. तसेच वजन कमी करण्यासही मदत करतं. आरोग्यासाठी ड्रॅगन फ्रूट हे अत्यंत गुणकारी मानलं जात असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी केली जाते.

भारतात गेल्या काही वर्षांत शहर, इमारती, वस्तू यांच्या नावांत बदल करण्याचा जोरदार ट्रेन्ड पाहायला मिळतोय. उत्तर प्रदेश आणि हैदराबाद हा ट्रेन्ड पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारकडून अनेक राज्यांची तसंच रेल्वे स्टेशन्सच्या नावांत बदल करण्यात आला. आता भाजपशासित गुजरातमध्ये फळाचंही नवं नामकरण करण्यात आलंय.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

महापौरांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अखेर अटक !

January 15, 2024

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

December 4, 2021

विश्व नवकार दिनानिमित्त सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

April 7, 2025

थरारक घटना : दोन मुलांसह बापाने पालिकेच्या इमारतीतून उडी मारत केला आत्महत्येचा प्रयत्न !

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group