TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 90 टक्क्यांवर – जिल्हाधिकारी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in आरोग्य, जळगाव
1
Share on FacebookShare on Twitter

           
जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान कालावधीत जळगाव जिल्ह्यात त्वरीत शोध, त्वरीत निदान आणि त्वरीत उपचार (ट्रेस, टेस्टींग, ट्रीटमेंट) या त्रिसुत्रीचा अवलंब केला जात आहे. या त्रिसुत्रीमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. शोधलेल्या व्यक्तींची त्वरीत तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या आजाराचे निदान करुन बाधित आढळलेल्या रुग्णांवर त्वरीत उपचार केले जात आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानकारक बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणासोबतच आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व आंगणवाडी सेविकांचेही कौतूक केले आहे.

READ ALSO

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

जिल्ह्यात आज (7 ऑक्टोबर) रोजी 505 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 45 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.22 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 701 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 1 हजार 679 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 2 हजार 686 रुगण हे लक्षणे नसलेले असून अवघे 1 हजार 15 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये 1 हजार 7 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 538, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 477 रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात 328 रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने गेल्या वीस दिवसांपासून सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 410 ने कमी झाली आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात 12 हजार 854 बेड असून त्यापैकी 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेड असून 322 आयसीयु बेडचा समावेश आहे.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. या तपासणीत लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 96 हजार 724 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 20 हजार 508 अशा एकूण 2 लाख 17 हजार 232 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 65 हजार 353 चाचण्या निगेटिव्ह तर 50 हजार 222 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 123 असून 534 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 211 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.41 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
Next Post

एक राजा बिनडोक तर दुसरा...! प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

Comments 1

  1. Dagdu patil says:
    6 years ago

    रेड क्रॉस सोसायटी शरीरातील अँटीबॉडी तपासणी करत आहे त्याच्यात किती टक्केची ऑंटी बॉडी तयार झाली आहे कृपया डिटेल माहिती द्यावी ही विनंती

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : सख्ख्या बहिणीने सुपारी देऊन केला भावाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 28, 2024

आमदार प्रणिती शिंदेंचा जळगाव दौरा ; पक्षसंघटनेचा घेतला धावता आढावा

May 15, 2021

जात सर्वेक्षणामुळे शिक्षक व्यस्त ; एणगाव हायस्कूलमध्ये ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच शिक्षक !

January 23, 2024

साप्ताहिक राशिभविष्य, ६ मार्च ते १२ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

March 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group