मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे. देशात 22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचं सत्र सुरु होतं. गेल्या 22 दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
देशातील महानगरांत दर काय?
शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77
दिल्ली 105.41 96.67
चेन्नई 110.85 100.94
कोलकाता 115.12 99.83
हैद्राबाद 119.49 105.49
कोलकाता 115.12 96.83
बंगळुरू 111.09 94.79