जळगाव (प्रतिनिधी) स्टार हाऊसिंग फायनन्स लिमिटेड (स्टार एचएफएल) ने आपले वितरण नेटवर्क विस्तारित करण्याच्या आणि देशभरातील अर्ध-शहरी व ग्रामीण भागांमधील आपली व्यवसाय उपस्थिती वाढवण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून भारतातील महाराष्ट्र येथील जळगावमध्ये नवीन शाखेचे उद्घाटन केले आहे. ही शाखा ८५, नवीपेठ, पद्मावती निवास, सेंट्रल बँकेसमोर, जळगाव ४२५००१ येथे आहे.
स्टार एचएफएलचे विदर्भामधील व्यवसाय प्रमुख निलेश पांडे म्हणाले की, कंपनीचा तंत्रज्ञान आणि टचपॉइंट्स या दोन्हींचा वापर करून योग्य ग्राहकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात क्रेडिट प्रदान करण्याचा मनसुबा आहे. जळगावमधील नवीन शाखेचा या क्षेत्रातील विद्यमान ग्राहकांसोबत कंपनीचे संबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश आहे. ही नवीन शाखा जवळपासच्या ठिकाणांहून व्यवसाय प्रक्रिया करण्यासाठी, उपलब्धता वाढवण्यासाठी आणि स्केल-अपची खात्री देण्यासाठी केंद्र म्हणून काम करेल.
स्टार एचएफएलचा विश्वास आहे की, महाराष्ट्र विशेषत: अर्ध-शहरी भागांमधील अनुकूल लोकसंख्या व वाढलेल्या किफायतशीरपणासह परवडणा-या गृहनिर्माणासंदर्भात प्रबळ निवासी बाजारपेठ आहे. कंपनीची विविध जिल्ह्यांमधील गृहनिर्माणाप्रती वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्यामधील उपस्थिती वाढवत राहण्याची योजना आहे.