धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून धरणगावातील संजय नगर भागात ६० लाखांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या महिला शौचालयाचे आज माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर आणि नगरसेवक सुरेश महाजन (बुट्या महाजन) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
संजय नगर परिसरात बांधण्यात आलेल्या शौचालयामुळे आता महिलांची गैरसोय होणार नाही. म्हणून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलासभाऊ महाजन, भाजपा शहर प्रमुख दिलीपभाऊ महाजन, गटनेते पप्पू भावे, वाल्मीक पाटील, उपतालुकाप्रमुख संजय चौधरी, बुट्या पाटील, युवा सेनेचे पवन महाजन, सोनू महाजन, चंद्रकांत माळी, पापा वाघरे, भाजपाचे कन्हैया रायपूरकर, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक ललित येवले, विजय महाजन, सुनील चौधरी, माजी नगरसेवक करण वाघरे, युवा सेनेचे हेमराज चौधरी, मयूर मोरावकर, प्रशांत देशमुख, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब जाधव, प्रशांतभाऊ देशमुख, संजय महाजन, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख विशालभाऊ महाजन, आबा धनगर, ऋषी महाजन, विजय महाजन, चेतन पाटील, वाल्मीक पाटील (तरडे), चंदू पाटील (पिंपळे), डॉ. कृष्णा मराठे, कमलेश बोरसे, अप्पू महाजन, छोटू महाजन, अण्णा महाजन, भाऊसाहेब पाटील यांच्यासह आदी शिवसेना भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.