जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शासकीय महाविद्यालयात आयकर विभागाचे पथक दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नाशिक येथील आयकर विभागाचे पथक सकाळपासून शासकीय महाविद्यालयात दाखल झाले असून, याचा उद्देश म्हणजे शासकीय महाविद्यालयातून करण्यात येणाऱ्या पेमेंट्सचे टीडीएस नियमितपणे आणि नियमाप्रमाणे कापला जात आहे की नाही, याची तपासणी करणे.
डॉ. गिरीश ठाकूर यांनी यावर अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, आयकर विभागाच्या पथकाला या तपासणीमध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. सर्व प्रक्रिया नियमावलीप्रमाणे पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, आयकर विभागाच्या पथकातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीमध्ये, चिंचोली येथील मेडिकल हब कॉलेजच्या बाराशे कोटीच्या केंद्राच्या प्रोजेक्टमध्ये टीडीएस संबंधित काही शंका उपस्थित केली आहे. या प्रोजेक्टमध्ये काही हेड्सवर दहा टक्के टीडीएस आहे, तर काही हेड्सवर दोन टक्के टीडीएस आहे, परंतु हा टीडीएस कापला गेला नसल्याचा संशय आयकर विभागाला आहे. यामुळे आयकर विभागाचे अडिशनल कमिशनर विद्या रतन किशोर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तपासणी करत आहे.
तपासणी सकाळपासून सुरू असून, या तपासणीमध्ये पथकाने सर्व विभागांची कागदपत्रे तपासली आहेत. तसेच, तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.कागदपत्रांची तपासणी केल्याचे सांगितले. तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच राहणार असल्याचे देखील कळते.