धरणगाव (प्रतिनिधी) येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “नीट परीक्षेत” उत्तुंग यश संपादन केलेल्या गुणवंतांचा प्रेरणादायी ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
२६ जानेवारी म्हणजेच “भारतीय प्रजासत्ताक दिन…” या विशेष दिवसाचे औचित्य साधून मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या “नीट परीक्षेत” उत्तुंग यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ग्रंथ भेट स्वरूप दिलेत. यात चेतन राजेंद्र पाटील या विद्यार्थाने नीट परीक्षेत ७२० पैकी ५५३ गुण संपादन केलेत. या यशाबद्दल तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या हस्ते या विद्यार्थाला ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हा ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. मेघराज रोहिदास महाले या विद्यार्थाने नीट परीक्षेत ७२० पैकी ४७० गुण मिळविले. या यशाबद्दल धरणगावचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते या विद्यार्थाला ‘दोंडाईचा चा डॉक्टर’ हा ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रतिक कैलास महाजन या विद्यार्थाने मेकॅनिकल डिप्लोमा परीक्षेत ९४.४४% गुण संपादन केल्याबद्दल पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते ‘द अलकेमिस्ट’ हा ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षिका नाजनिन शेख यांना ‘राहत इंदोरी’ साहेबांचे पुस्तक भेट स्वरूप देऊन गौरविण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमाच्या सुरवातीला कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी व सुरेखा सुनिल चौधरी यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी तहसिलदार नितीनकुमार देवरे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी, सुरेखा सुनिल चौधरी, रोहिदास महाले, राजेंद्र पाटील, विकल्प ऑर्गनायझेशनचे लक्ष्मण पाटील, गुड शेपर्ड स्कुलच्या नाजनिन शेख, पो. स्टे. च्या गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार व संदानशिव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिष चौधरी, पायल चौधरी व गौरव चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी केले.