मुंबई (वृत्तसंस्था) भारतात गेल्या अनेक दशकांपासून भारतीय पोस्ट ऑफिसचे (Post Office) प्रचंड मोठे जाळे आहे. एलआयसीप्रमाणे पोस्ट ऑफिसवर देशवासीयांचा मोठा विश्वास आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा हवा असल्यास पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास बँकेतील एफडीपेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC).
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूकदाराला 6.8 टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही किमान 1000 आणि त्यावर तुम्हाला हवे तितकी गुंतवणूक करू शकता. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करताना फक्त हे लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त 100 च्या पटीत गुंतवणूक करायची आहे.
किती वर्षात पैसे होतील दुप्पट?
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे गुंतवलेले पैसे 10 वर्षे आणि 6 महिन्यांत 6.8 टक्के वार्षिक व्याजाने दुप्पट होतील. या योजनेत, जर तुम्ही 5 वर्षांत एकूण 1000 गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 1389 रुपये मिळतील.
योजनेत गुंतवणूक करण्याची पात्रता
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 10 वर्षे असणे आवश्यक आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटद्वारे तुम्ही जॉईंट किंवा सिंगल दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे गुंतवणूक करू शकता. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे खाते उघडल्यानंतर, पालकांकडून त्यावर नजर ठेवली जाईल. 10 ते 18 दरम्यान, खाते अल्पवयीन स्वरूपात असेल. 18 नंतर खाते प्रौढ खात्यात रूपांतरित केले जाईल. या योजनेअंतर्गत तीन लोकांच्या नावाने संयुक्त खाते उघडता येते.
कर सवलतीचा लाभ मिळवा
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक केल्यावर, गुंतवणूकदारांना आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा परतावा मिळेल. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही हे पैसे पाच वर्षापूर्वी काढू शकत नाही.