TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीनेच रचले पतीच्या हत्याकांडाचे षड्यंत्र ; कारण वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोली (वृत्तसंस्था) अतिदुर्गम कोरची तालुक्यातील बेडगावपासून सहा किमी अंतरावर असलेल्या दवंडी येथील एका किराणा दुकानदाराची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली होती. या सिनेस्टाईल हत्याकांडाचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या हत्याकांडाच्या गुन्ह्यात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अज्ञात ५ ते ६ हल्लेखोरांनी खून केल्याचा रचला बनाव !

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

लखन सुन्हेर सोनार (वय ३८) असे हत्या झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. तर सरिता लखन सोनार, सुभाष हरिराम नंदेश्वर (दोघेही रा. दवंडी) व बळीराम गावडे (रा. कुकडेल) अशी आरोपींची नावे आहेत. घटनेच्या दिवशी अनोळखी ५ ते ६ काळे कपडे परिधान केलेल्या व्यक्तींनी लखन सोनार यांच्या घरात शिरून त्यांच्या पत्नीसमोर धारदार शस्त्राने हत्या केली होती. याप्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये १२ ऑक्टोबर रोजी ९. २५ वाजता अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासात समोर आली अनैतिक संबंधाची माहिती !
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. मयताची पत्नी नामे सरिता लखन सोनार हिचे सुभाष हरिराम नंदेश्वर या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पती लखन सोबत नेहमीच वाद होत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली. याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत मयताच्या पत्नीकडे अधिक विचारपूस सुरु केली.

९ ऑक्टोबर रोजी रचला हत्येचा कट !
सुरुवातीला तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नंतर मात्र, तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत लखन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करत होता. या त्रासाला कंटाळून आरोपी पत्नी सरिता हिने तिचा प्रियकर सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढावा, याकरिता तगादा लावला. ९ ऑक्टोबर रोजी लखन सोनार याच्या हत्येचा कट रचून हत्येची जबाबदारी बळीराम गावडे (रा. कुकडेल) याच्याकडे दिली.

‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
११ ऑक्टोबरच्या रात्री सरिता व लखन एका खोलीत झोपले होते. मुलगी पायल व मुलगा प्रणय हे वेगळ्या खोलीत होते. आधीच ठरल्याप्रमाणे सरिताने रात्री झोपताना घराच्या दरवाजाची आतून कडी न लावता फक्त लोटून घेतला. त्यानंतर दारूच्या नशेत सुभाष नंदेश्वर व बळीराम गावडे यांनी घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने झोपेतच लखनच्या गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केली. मारेकरी पळून गेल्यावर सरिताने आरडाओरड करून अज्ञातांनी पतीला संपविल्याचा बनाव रचला होता. दरम्यान, सोनार दाम्पत्यास दोन अपत्ये आहेत. वडिलांचा खून तर आई जेलमध्ये गेल्यामुळे मुलगी पायल (१६), मुलगा प्रणय (१२) हे निराधार झाली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धानवड येथे २ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : बारामतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : एजंट महिलेला अटक !

November 21, 2021

राजपूतसह सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासावर भर द्या ; श्यामसिंग ठाकूर यांचे प्रतिपादन

January 16, 2022

‘आधी उधारी चुकवा, मगच जा’ ; हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोतांना अडवलं

June 16, 2022

मोबाईल विक्रीच्या नावाखाली दुकानदाराची फसवणूक ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

September 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group