TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या ‘समर कॅम्प-२०२३’चा समारोप ; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळांडूचा केला गौरव !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन स्पोर्टस् अॅकडमीतर्फे १६ एप्रिल ते १४ मे दरम्यान ‘समर कॅम्प-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप समारंभ विद्या इंग्लीश मिडीअम स्कूलच्यामागे असलेल्या क्रीडांगणावर झाला. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा क्रीडा साहित्य व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिक्षक व्ही. एन. तायडे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.

READ ALSO

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

उन्हाळी प्रशिक्षणाचा आढावा मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी सांगितला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. आभार अजित घारगे यांनी मानले. बॅडमेंटनचे सहप्रशिक्षक गीता पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले. खेळाडूंना शुभेच्छा देताना नंदलाल गादिया यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीर हे शारिरीक, मानसिक आरोग्य सांभाळत पाल्यांचा सर्वांगिण विकास करणारे ठरले. यातूनच राज्य, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू आपला विकास करून शकतात. खेळ, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याने त्यांचेही आभार नंदलाल गादिया यांनी मानले. डॉ. अश्विन झाला यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमी विविध क्रीडा प्रकारांत हे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि आरोग्यासंबधी जागृतता आणत असून यातूनच राष्ट्रनिर्माणाचे कार्य घडत आहे. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य देबासिस दास यांनी व्यक्त केले. जळगावसारख्या शहरात श्री. अतुल जैन यांच्यासारख्या क्रीडाप्रेमीमुळे अनुभूती निवासी स्कूल येथे खेळासाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे खेळाकडे विद्यार्थी करिअरच्यादृष्टीने बघत असल्याचेही देबासिस दास म्हणाले.

जैन स्पोर्टस अॅकडमीतर्फे केवळ उन्हाळी शिबीरार्थींचा नव्हे तर विविध क्रीडाप्रकारांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक व खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यामध्ये निलम घोडगे, अभिजीत त्रिपणकर, वाल्मिक पाटील, कांचन चौधरी, अजित घारगे, पुष्पक महाजन, प्रविण ठाकरे, शुभम शर्मा, तनेश जैन, किशोरसिंग सिसोदिया, शशांक अत्तरदे, ओम मुंढे, शुभम पाटील, योगेश्वरी धोंगडे, मनिषा हटकर, क्रिष्णा हटकर, प्रणव भोई, निलेश पाटील, श्रेयांक खेकरे, सरीपट्टा घेटे, निकेतन खोडके, रोहन अवधूत, महिमा पाटील, शितील रूढे, निशा अवधूत, तेजस्वीनी श्रीखंडे, सायली कुलकर्णी, रिषभ कारवा, सिद्धेश देशमूख, नचिकेत ठाकूर, तुलजेस पाटील, तन्वीर अहमद, सोनल हटकर, साक्षी पाटील, गौरी साळूंखे, आयशा साजीद खान, मिताली पाठक, फरहीन खान, पुष्करणी भट्टड, वरूण देशपांडे, घनशाम चौधरी, राहुल निभोंरे, उदय सोनवणे, पंकज पवार, योगेश धोंगडे, अनिल मुंढे, रहिम खान, निलम अन्सारी, सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. दरम्यान जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वाच्च समितीत निवडून आल्याने त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या सर्व खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये बुद्धिबळसाठी सुजल चौधरी, श्लोक वारके, क्षितीज वारके, तायक्वांदोसाठी दानिश तडवी, निकिता पवार, पुष्कप महाजन, बास्केटबॉलसाठी प्रियांशू जाधवानी, चिन्मय सूर्यवंशी, विरेंद विसररानी, उमंग बेंडवाल, सोहम पाटील, पूर्वा हटकर, फुटबॉलसाठी निव जेलवाणी, हुझेर देशमुख, अर्थव राठोड, दुर्वेश देवरे, रशिद शेख, बॅडमेंटनसाठी आर्या गोला, शौनक माहेश्वरी, ईशांत साळी, पुनम ठाकूर, डॉ. हर्षदा पाटील, अमोघ बाविस्कर, श्रीनिवास पाटील, हर्द झाला, अद्विती पाटील, क्रिकेटसाठी श्रेयस नारजोगे, केतन जैन, आरव यादव, अनय चतुर्वेदी, शेख अब्दुला शेख जावेद, एकता दहाळ, दक्ष ओटोळे, गौरव ठाकूर यांचा समावेश होता. यात वेद पटेल हा सर्वात्कृष्ट शिबीरार्थी ठरला त्याला क्रिकेटचे संपूर्ण किट देऊन सन्मानित करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकूल, मुश्ताक अली, वरूण देशपांडे, राहुल निभोंरे, घनशाम चौधरी, उदय सोनवणे यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
Next Post

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरण : जाणून घ्या... साक्षीदार किरण गोसावीचे जळगाव कनेक्शन काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकीवर आलेल्या दोघांनी महागडा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

July 10, 2024

वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 8, 2020

बालकवी ठोंबरे विद्यालयात एकाग्रतेसाठी योग याविषयावर व्याख्यान संपन्न!

June 28, 2022

दुसखेडा येथे वृद्धाचे हातपाय बांधून तीन लाखांची रोकड लंपास !

December 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group