जळगाव (प्रतिनिधी) सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने तारण ठेवून त्यावर २ लाख लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतु ते दागिने बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर सोने तारण ठेवणाऱ्यांना फायनान्स कंपनीने त्याच दागिन्यांवर जास्तीचे कर्ज देण्याच्या बहाण्याने बोलावून घेत भामट्यांना रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवार दि. ६ जून रोजी सकाळी अकरा वाजता मनप्पूरम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील नवीपेठेतील मनप्पुरम फायनान्स लिमिटेड कंपनीत हर्षल रविंद्र पेटकर (रा. दिग्रस, जि. यवतमाळ) हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. त्यांच्या कार्यालयात तेजस देविदास ठाकूर (रा. शाहूनगर) हा तरुण क्लर्क असून त्याचे काम सोने तारण ठेवणे व रोकड सांभाळणे आहे. दि. १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास तीन जण सोन्याचे दागिने घेवून ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी क्लर्क तेजस ठाकूर यांना सोने तारण ठेवून कर्ज पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर सोबत आणलेल्या चार बांगड्या, कानातील एक जोड झुमके असे ठाकूर यांना दिले. त्यानंजर वजन आणि टंच असिस्टन्ट अरुण मनोजकुमार अहिरवाल यांनी काढला, त्यानंतर जोरा राम राणुराम बिसनोई रा. नशिराबाद याच्या नावाने प्रकरण मंजूर करुन त्यांना २ लाख ६६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर दि. ५ जून रोजी दोन इसम पुन्हा आधी ठेवलेल्या बनावट दागिन्यांसारखे दागिने गहाण ठेवण्यासाठी आले. मॅनेजर आणि क्लर्क तेजस ठाकूर यांना संशय आल्याने त्यांनी दागिन्यांची टंच बारकाईने तपासली. परंतु ते दागिने गोल्ड प्लेटेड नकली सोन्याचे असल्याचे आढळून आले.
फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी बनावट दागिने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या जोराराम रानूराम बिस्नोई यांना कॉल केला. त्यांना तुम्ही गहाण ठेवलेल्या दागिन्यांवर अजून कर्ज तुम्हाला मिळेल असे सांगितले. तयानुसार ते पैसे घेण्यासाठी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये आले असता, कर्मचाऱ्यांनी त्याला रंगहाथ पकले. तसेच त्यांच्या ऑफिसबाहेर उभा असलेल्यांसह स्टेशनरोडवरील हॉटेलमध्ये थांबवलेल्या दोघांना पोलिसांच्या मदतीने रंगेहाथ पकडले. बनावट दागिने गहाण ठेवून त्यावर कर्ज घेणाऱ्या जोजाराम रानुराम बिस्नोई (वय ५०, रा. मूळ रा. दोडासर त. जि. फलौदी, राजस्थान, ह. मु. नशिराबाद व रामेश्र्वर कॉलनी) याच्यासह खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (वय ३१, मूळ रा. रामबाग, आग्रा, उत्तरप्रदेश, ह. मु. बालाजीपेठ), संतिषचंद शोवरन सिंग (वय ३२, मूळ रा. आग्रा, उत्तरप्रदेश) व संतोष मुन्नालाल कुशवाह (वय ३५, रा. किशोरपुरा, आग्रा, उत्तरप्रदेश) या चौघांना अटक करण्यात आली आहे.