धरणगाव (प्रतिनिधी) खान्देश केसरी पुरस्कारासाठी आज मंगळवारी येथे कुस्ती होणार आहे. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (पुणे) आणि हिंदकेसरी सोनू कुमार (हरियाणा) यांच्यात ही मुख्य लढत होणार आहे.
लढत आज दुपारी ३ वाजेपासून मरीआई मंदिराच्या परिसरातील आखाड्यात होणार आहे. यावेळी व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार व महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक मिळाल्याबद्दल श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.