जळगाव (प्रतिनिधी) पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या आर्ट गॅलरीमध्ये एक बालकलाकार मनस्वी जोशीच्या स्केचेसचे प्रदर्शन सुरू झाले आहे. हे प्रदर्शन दिनांक ३ नोव्हेंबर ते १५नोव्हेंबर २०२२ चालू राहणार आहे.
या कार्यक्रमाचे उ्घाटन मा. कुलगुरु डॉ विजय महेश्वरी सर यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्ण नागरी, बानाना कॅपिटल याच प्रमाणे पू.ना.गाडगीळ यांच्या आर्ट गॅलरी मुळे जळगाव शहर आता सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे असे प्रतिपादन कुलगुरु महोदयांनी केले. एखाद्या कलेतून कशी प्रगती होते हे विविध उदाहरण देऊन सागितले.
प्रमूख अतिथि म्हणून केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर हे होते. विद्यार्थिनी छंद म्हणून कमीत कमी एक ते दोन कलांमध्ये प्रावीण्य मिलवले पाहिजे, तसेच करियर आणि छंद हे याचा आपल्या जिवनावर कसा महत्त्वाचा परिणाम होतो हे विविध उदाहरण देऊन सागितले. हेमात्ताई अमळकर, संदीप पोतदार सर, सचिन मुसळे सर यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाताई कुरुंभट्टी यांनी केले. सरस्वती वंदना स्वरमई देशमुख हिने सादर केली. तर आभार मनस्वी जोशी हिने मानले. या कार्यक्रमा साठी सूकृती पिनेकल हौसिंग सोसायटीचे सदस्य, विवेकानंद प्रतिष्ठानचे शिक्षकवृंद, चित्रकार व पत्रकार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.