TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये बाचाबाची

पोलीस निरीक्षकांच्या दालनातील घटना ; दिपककुमार गुप्ता यांची तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रामानंद नगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या दालनातच पोलिस उपनिरीक्षक व कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करीत असल्याच्या संशयावरुन तो वाद झाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख व पोलीस कर्मचारी अनमोल पटेल यांच्यात वाद झाला. पोलीस निरीक्षकांच्या दालनातच हा वाद झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी याप्रकरणी देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाब्दिक वाद झाल्याचे गुप्ता यांना सांगितले.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

नेमकं काय घडलं ?

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली असून पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या दालनात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील गुप्ता यांनी केलेल्या एका तक्रारीवरून तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाली होती मात्र पोलीस निरीक्षकांवर काहीही कारवाई झालेली नाही.

वीर सावरकर नगरातील गीताई अपार्टमेंटचे काही रहिवासी आणि नवकार इंटरप्रायझेस श्रीकृष्ण कॉलनी येथील विशाल राजेंद्र चोपडा यांनी ऍड.केदार भुसारी यांच्यामार्फत नूर मोहम्मद अब्दुल गफूर व मरियमबी अब्दुल गफूर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज केलेला होता. सदर प्रकरणी अर्ज चौकशी अंमलदार अनमोल पटेल हे गैरअर्जदारांची बाजू घेत होते. तक्रारदार यांच्या हा प्रकार लक्षात त्यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करीत अनमोल पटेल यांच्याकडून तपास काढून घेण्याची मागणी केली होती.

सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी अर्जाची दखल घेत तपास काढून घेण्याचे सांगितले. शनिवारी याच प्रकरणात पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख आणि कर्मचारी अनमोल पटेल यांना दालनात बोलाविले होते. दोघांमध्ये यावेळी जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्याने एकाने दुसऱ्यावर पाणी बाटली आणि खुर्ची देखील फेकून मारल्याचे समजते. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

निरीक्षकांच्या दालतान सोक्षमोक्ष

शनिवारी सकाळी ११ वाजता निरीक्षक विजय शिदे यांच्या दालनात उपनिरीक्षक देशमुख, हवालदार पटेल व गैरअर्जदार गफूर असे एकत्र आले. कोण कोणाला काय बोलले यावरुन सोक्षमोक्ष करीत असतानाच पटेल यांनी एकेरी भाषेत उल्लेख करुन आपल्या अंगावर धावून आल्याचा आरोप देशमुख यांनी ‘एका वृत्तसंस्थे’शी बोलताना केला. यासंदर्भात आपण वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.

तरी प्राथमिक व विभागीय चौकशी केली जाणार – कुमार चिंथा

उपनिरीक्षक गोपाल देशमुख व अनमोल पटेल या दोघांची आपण चौकशी केली. चौकशी अर्जातील गैरअर्जदाराच्या संदर्भात दोघांमध्ये वाद झाले होते. गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे. तरी देखील याची प्राथमिक व विभागीय चौकशी केली जाणार आहे, असं सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती ; भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : शेतात खत टाकताना शेतकऱ्याचा अचानक मृत्यू !

August 23, 2023

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, ८ जणांचा मृत्यू, सैन्याने ४३० लोकांना बाहेर काढलं

April 24, 2021

शरद पवार शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

April 11, 2021

जिल्हा दूध संघ निवडणूक : सर्वपक्षीय पॅनलच्या शक्यता वाढल्या !

November 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group