जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागातील तरूणीसोबत प्रेमसंबंध असताना तरुणाने तिला व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. एवढेच नाहीतर तो व्हिडीओ व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस पाहण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव शहरातील एका भागातील २२ वर्षीय तरूणीचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तरूणाने एकेदिवशी तरूणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला. यात तरूणाने तरूणीला अंगावरचे संपूर्ण कपडे काढण्यास सांगितले. तरुण जसे सांगेल तसेच तरुणीने त्यास करून दाखविले. हा संपूर्ण प्रकार तरूणाने रेकॉर्ड केला व तयार अश्लील व्हिडिओ त्याच्या मित्राला व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला. या प्रकाराने तरुणीची बदनामी झाली. अशी तक्रार तरुणीने मंगळवार दि. १ मार्च राेजी जळगाव सायबर पोलिसांत दिली असून त्यावरुन तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.