जळगाव (प्रतिनिधी) आज सकाळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी येथे क्रांती दिन निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले.
सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन पासून टॉवर चौक, नेहरू चौक, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काँग्रेस भवन पर्यंत रॅली काढण्यात आली असून यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी समवेत संजय पाटील सेवादल, जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्ष सौ सुलोचना वाघ, शाम तायडे, जमील शेख, विजय वाणी, शशिकांत तायडे , मुक्तदिर देशमुख, दिपक सोनवणे, मनोज सोनवणे, जाकीर बागवान, योगेश देशमुख, जगदीश गाढे, विष्णू घोडेस्वार, प्रदिप सोनवणे, पी जी पाटील, ज्ञानेश्वर कोळी, अजमल शहा,उद्धव वाणी, नितीन चौधरी, राजेंद्र श्रीनाथ, नदीम काझी, छाया कोरडे, अशपाक काझी, भगवान मेढे, महेंद्रसिंग पाटील, विजय पाटील, भरत कुवर, राहुल भालेराव, प्रमोद गुघे, गोकुळ चव्हाण यांच्यासह
असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.