जळगाव (प्रतिनिधी)आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) भाजपकडून लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडे जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.
लोकसभेची निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यासाठी भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. भाजपकडून मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक 2024 प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे यांची निवड केली आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे 2024 मधील निवडणूक अत्तरदे यांना लढविता येणार नाही, म्हणूनच पक्ष नेतृत्नेवाने त्यांना ही जबाबदारी दिली असल्याची चर्चा आहे. चंद्रशेखर अत्तरदे यांना मिळालेल्या जबाबदारीमुळे मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील आनंदी आहेत.