TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : परिचारिकेच्या खूनाचा उलगडा, मृतदेहाचे गुढ मात्र, कायम !

नदीपात्रात मृतदेहाचा शोध सुरुच ; पोलीस अधीक्षकांच्या कर्तव्यदक्षतेमुळे खूनाचा उलगडा !

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तीस लाख रुपयांसाठी सेवानिवृत्त परिचारीका स्नेहलता चुंबळे (६०, रा. खोटेनगर, ह. मु. नाशिक) यांचा खून हा दोन दिवसांपुर्वी केलेला पूर्वनियोजीत कट होता. संशयितांनी खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतची संपूर्ण तयारी केली होती. त्यांनी परिचारिकेचा मृतदेह तापी नदीपात्रात फेकल्याचे पोलिसांना सांगितले खरे, मात्र त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट दुसऱ्या पद्धतीने तर लावली नाही ना? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. जो पर्यंत महिलेचा मृतदेह मिळून येत नाही तो पर्यंत हे गुढ कायम राहणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त परिचारीका ग. स. सोसाटीच्या सभेला आल्यानंतर दि. २० रोजीत्या बेपत्ता झाल्या होत्या. दि. २२ ऑगस्ट रोजी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. ३० लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेसह महिला बेपत्ता असल्याने तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद होऊन आठवडा उलटला तरी तपास लागत नव्हता. त्यामुळे चिंतत असलेले चुंबळे यांच्या मुलाने पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत सर्व हकीकत सांगितली. त्या वेळी डॉ. रेड्डी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना तपासाविषयी सूचना दिल्या.

READ ALSO

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

ग. स.च्या सभेसाठी येण्यापुर्वीच स्नेहलता चुंबळे या खुनातील मुख्य सूत्रधार जि.प. आरोग्य विभागातील कनिष्ट लिपिक जिजाबराव अभिमन्यू पाटील याच्या संपर्कात होत्या. त्या फ्लॅट घेण्यासाठी बँकेतून पैसे काढणार असल्याचे त्याला माहित असल्याने त्याने आपला साथीदार जि.प. बांधकाम विभागातील लिपिक विजय रंगराव निकम याच्यासोबत दि. १८ रोजी दोन दिवसांपुर्वी कट रचून तयार केली होती. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी प्लास्टीकची गोणी आणि दोरी देखील खरेदी करुन कारमध्ये ठेवलेल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

बँकेतून पैसे काढल्यानंतर जिजाबराव पाटील याने मोबाईल बंद करुन ठेवला. पथकाला मिळालेल्या फुटेजमध्ये कार चालकाच्या बोटात अंगठ्या आणि हातात लाल रंगाचा दोरा असल्याचे कैद झाले होते. पथकाला तोच तपासाचा धागा गवसला आणि त्यांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाहन चालवित असलेल्या विजय निकम याच्या हातात तोच दोरा आणि अंगठ्या असल्याचे दिसताच ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

महामार्गावरून जाताना टोल नाकेही चुकविले !
निवृत्त परिचारिकेसोबत आपण आहे, हे समजू नये म्हणून दोघांनी महामार्गावरून जाताना टोल नाकेही चुकविले व अमळनेर तालुक्यातील आर्वी मार्ग ते शिरपूरच्या दिशेने गेले. हा खून पाटील याच्या महागड्या गाडीत करण्यात आल्याने ती गाडी जप्त होऊ नये म्हणून पाटील याने दुसरे जुने वाहन दाखविण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो पोलिसी खाक्यापुढे फसला.

अटकपूर्व जामिनासाठी काढले होते पैसे
खून केल्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते, अशी कुणकूण लागताच दोन्ही संशयितांनी अटकपूर्व जामीनसाठी प्रत्येकी एक लाख ३० हजार रुपये वकिलांसाठी काढून ठेवले होते. दोघांनी नेहलता चुंबळे यांना बँकेतून पैसे काढण्याविषयी घरी सांगू नका, असा आग्रहदेखील दोघांनी निवृत्त परिचारिकेला केला होता. जो पर्यंत मयत स्नेहलता चुंबळे यांचा मृतदेह सापडणार नाही तो पर्यंत या घटनेचे गुढ कायम राहील. पोलिसांकडून नदीपात्रात मृतदेहाचा शोध घेतला जात असून एक पथक त्यासाठी ठाण मांडून आहेत.

पथकाने पुरावे दाखविताच दोघांची बोबडी वळली
एलसीबीचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकों जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक राहुल पाटील, भारत पाटील यांनी बँकेसह महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवित तांत्रिक विश्लेषणावरुन जिजाबराव पाटील व विजय निकम या दोघांची नावे निष्पन्न केली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र त्यांना खाक्यांसह पुरावे दाखविताच दोघांची बोबडी वळली अन् त्यांनी खुनाची कबुली दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

धक्कादायक : पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर दुचाकीस्वाराने टाकला ज्वलनशील पदार्थ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कूपन स्कॅन करा, तुम्हाला डबल पेमेंट मिळेल ; भुसावळच्या विवाहितेला सव्वा लाखांचा गंडा !

April 12, 2023

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४०,१३४ कोरोनाबाधित, ४२२ रुग्णांचा मृत्यू

August 2, 2021

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाचा संसर्ग !

September 18, 2020

‘त्या’नंतर टाळेबंदीबाबत निर्णय – उपमुख्यमंत्री पवार

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group